भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) LIC ही भारत देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे.एलआयसी ही कंपनी पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची आहे.योगक्षेमं वहाम्यहम्. (तुमची समृद्धी ,आमचे कर्तव्य) हे भारतीय विमा मंडळाचे बोधवाक्य आहे. मुख्यतः जीवन विमा सेवा पुरवणाऱ्या एलआयसीने गेल्या काही वर्षांपासून इतर आर्थिक उत्पादने देखील बाजारात आणली आहेत. युलिप, म्युच्युअल फंड, गृहकर्ज इत्यादी सेवा सध्या एलआयसीमार्फत पुरवल्या जातात. ब्रीदवाक्य ज़िन्दगी के साथ भी, ज़िन्दगी के बाद भी प्रकार विमा कंपनी उद्योग क्षेत्र विमा स्थापना १ सप्टेंबर १९५६ मुख्यालय मुंबई, भारत उत्पादने जीवनविमा, म्युच्युअल फंड, गृहकर्ज महसूली उत्पन्न Indian Rupee symbol.svg १३.२५ निखर्व मालक भारत सरकार कर्मचारी १,१५,९९६ पोटकंपनी ६६ संकेतस्थळ www.licindia.in उद्देश :-जीवन विम्याचा प्रसार सर्वत्र ,विशेषतः ग्रामीण भागात करणे ,जेणेकरून देशातील प्रत्येक विमा उतरविण्यायोग्य व्यक्तीपर्यंत ही सेवा पोहचेल आणि वाजवी दरात त्यांना पुरेसे आर्थिक संरक्षण देता येईल. ……………………… प्रत्येक व्यक्ती ही मुळत:भिन्न आहे.प्रत्येक व्यक्तीच्या विम्याच्या गरजा आणि आवश्यकता ईतरांच्यापेक्षा वेगळ्या आहेत. ’एलआयसी’ च्या विमा योजना या प्रमाणे आहेत ज्या तुमच्याशी वैय्यक्तिकरित्या संवाद करतात आणि तुम्हाला तुमच्या गरजांशी जुळणारा सर्वात योग्य पर्याय देतात.